Friday, November 6, 2026
Homeक्राईमBribery News : लाच घेताना प्राचार्याला रंगेहाथ पकडले

Bribery News : लाच घेताना प्राचार्याला रंगेहाथ पकडले

शिक्षिकेची अडवणूक, घारगाव येथील घटनेने शिक्षण वर्तुळात खळबळ

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र ज्ञानमंदिराला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना घारगाव (ता. संगमनेर) येथे समोर आली आहे. येथील रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ संचलित भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय दगडू राणे याला 50 हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.4) दुपारी रंगेहाथ पकडले. सहकारी महिला शिक्षिकेची अडवणूक करून तिच्याकडून पैसे उकळणार्‍या या प्राचार्याच्या अटकेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

नाशिक लाचलुचपत पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला शिक्षिकेच्या एक स्तर वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्राचार्य संजय राणे याने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पीडित शिक्षिकेने यापूर्वीही अनेकदा या मुख्याध्यापकाला पैसे दिले होते. मात्र, पैशांची हापापलेली भूक शांत न होता हा लाचखोर मुख्याध्यापक वारंवार पैशांसाठी छळत होता. अखेर प्राचार्याच्या या जाचाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून शिक्षिकेने नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली.

तक्रार मिळताच पोलीस उपाधीक्षक सुरेश शिरसाठ आणि त्यांच्या पथकाने घारगाव येथे सापळा लावला. बुधवारी दुपारी भारत हायस्कूलच्या प्राचार्य केबिनमध्येच पथकाने महिला शिक्षिकेकडून लाचेची 50 हजार रुपयांची रोकड स्वीकारताच रंगेहाथ पकडले. या प्रकारामुळे घारगाव परिसरातील पालकांमध्ये आणि शिक्षण वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दिवाळी होताच चेअरमनपदाचा बार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मंगळवार (दि. 3) रोजी निकाल जाहीर झाला असून, बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी येत्या 12 नोव्हेंबर रोजी संचालक...