Thursday, March 13, 2025
Homeक्राईममंडळाधिकारी कार्यालयातील खाजगी मदतनिस लाचलुचपतच्या जाळ्यात

मंडळाधिकारी कार्यालयातील खाजगी मदतनिस लाचलुचपतच्या जाळ्यात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बेलापूर मंडळाधिकारी कार्यालयातील एका खाजगी मदतनिसला (Private Assistant) दहा हजार रुपयाची लाच (Bribe) स्विकारताना ला.प्र.विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील गळनिंब येथील तलाठी कार्यालयात खरेदी खताची नोंद सातबार्‍यावर न घेण्यासाठी हरकत अर्ज दाखल करण्यात आला आहे. सदर हरकत अर्जाची सुनावणी मंडलिक (मंडळ अधिकारी, श्रीरामपूर, अतिरिक्त कार्यभार बेलापूर) यांच्याकडे चालू आहे.

- Advertisement -

या हरकत अर्ज प्रकरणामध्ये केसचा निकाल तक्रारदारच्या बाजूने देण्यासाठी मंडळाधिकारी कार्यालय, बेलापूर (Belapur) येथे खाजगी मदतनीस म्हणून कार्यरत असलेले शहाजी केरु वडीतके या ंनी मंडळाधिकारी मंडलिक यांच्यासाठी 10 हजार रुपये रक्कमेची लाच (Bribe) मागितली होती. याप्रकरणी तक्रार ला. प्र. वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान शहाजी केरू वडीतके हा 10 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासी अधिकारी ला.प्र.वि.अहिल्यानगर पोलीस निरीक्षक राजु आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी अजित त्रिपुटे तसेच सापळा पथक पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, उमेश मोरे, हारुण शेख यांच्या पथकाने सदर कारवाई पार पाडली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...