Sunday, June 14, 2026
Homeक्राईमCrime News : कट मारल्याच्या कारणावरून व्यावसायिकावर हल्ला

Crime News : कट मारल्याच्या कारणावरून व्यावसायिकावर हल्ला

रूग्णालयात उपचार सुरू || चौघांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यावसायिकावर लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (28 मार्च) रात्री 9:10 वाजताच्या सुमारास अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावरील सावेडी परिसरातील हॉटेल संजोग समोर घडली. शेख मोहसीन अब्दुल कादर (वय 41, रा. जुने कलेक्टर ऑफिस जवळ, हातमपुरा, अहिल्यानगर) असे जखमी व्यावसायिकाचे नाव असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ शेख फिरोज ईस्माईल (वय 50, रा. जुने कलेक्टर ऑफिस जवळ, हातमपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीरून अनोळखी चार जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी (29 मार्च) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मोहसीन अब्दुल कादर हे मनमाड रस्त्यावरील आपले मोबाईलचे दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतत होते. रात्री 9:10 वाजेच्या सुमारास संजोग लॉनजवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला कट मारला. यावरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संबंधित अज्ञात इसमाने फोन करून आपल्या तीन मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. या चौघांनी मोहसीन यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

या वादात एकाने मोहसीन यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरात प्रहार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर संशयित आरोपी तिथून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहसीन यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून मारहाण करणार्‍यांचा शोध सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...