Wednesday, January 15, 2025
Homeक्राईमव्यावसायिकाचे घर फोडून सुमारे 15 लाखांचा ऐवज लांबविला

व्यावसायिकाचे घर फोडून सुमारे 15 लाखांचा ऐवज लांबविला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर शहरातील माणिकनगर येथील देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घरफोडून चोरांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह सुमारे 15 लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. माणिकनगरमधील पत्रकार कॉलनीतील व्यावसायिक कुटुंब 2 नोव्हेंबर 2024 रोजी देवदर्शनासाठी राज्यस्थानला गेले होते. शनिवारी (9 नोव्हेंबर) घरी पोहोचले असता घरातील साहित्याची उचकापाच दिसून आली.

- Advertisement -

घराचा पाठीमागील दरवाजा उघडला दिसला. त्याचा कडीकोयंडा तुटलेला होता. घरातील कपाटाची पाहणी केली असता उचकापाच दिसली. कपाटातील 70 हजारांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 15 लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे दिसून आले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून शोध सुरू केला. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या