Tuesday, December 3, 2024
Homeनगरप्रचार करताना विनापरवाना लाऊड स्पिकर वाजविल्याने दोन वाहनचालकांवर गुन्हा दाखल

प्रचार करताना विनापरवाना लाऊड स्पिकर वाजविल्याने दोन वाहनचालकांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आचारसंहिता कक्षाकडून वाहन परवाना तसेच लाऊड स्पिकर वाजविण्याचा परवाना नसल्याप्रकरणी प्रचार करताना दोन वाहनचालकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागू असून, प्रत्येक उमेदवारांकडून प्रचारासाठी वाहनांवर ध्वनीक्षेपक लावून ठिकठिकाणी प्रचार करण्यात येत आहे. परंतू ध्वनीक्षेपक लावून प्रचारासाठी वापरतांना आचारसंहिता कक्षाकडून सदर वाहन परवाना तसेच लाऊड स्पिकर वाजविण्याचा परवाना घेणे बंधनकारक आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघामध्ये वाहन (टाटा झीप क्र. एमएच 17 एजी 5911 व पॅगो रिक्षा क्र. एमएच 17 बीझेड 0344) यावरील चालकाने वाहन विनापरवाना तसेच वाहन चालवताना ध्वनीक्षेपक वाजवून उमेदवारांचा प्रचार करताना मिळून आले. सदर वाहने ताब्यात घेऊन वाहन चालक किशोर बाळासाहेब काळे (रा. पूर्णवादनगर, वॉर्ड नं. 7), अरुण कारभारी खंडिझोड (रा. म्हाडा हौसींग सोसायटी) यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम 223 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी वाहनांवर ध्वनीक्षेपक वाजवताना सदर वाहनाचा तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्याचा पोलीस स्टेशनचा विहीत परवाना घ्यावा. वाहन नेमून दिलेल्या भागातच फिरवावे तसेच वाहन एका जागी उभे ठेवूनच ध्वनीक्षेपक वाजविण्यात यावे, आणि ध्वनीक्षेपक वाजविताना कर्कशपणे न वाजविता सर्वोच्य न्यायालयाने विहीत केलेल्या ध्वनी मर्यादेचे पालन करावे, अन्यथा प्रचलीत कायद्यानुसार तसेच आदर्श आचार संहितेचे पालनासंबंधाच्या नियमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरिक्षक नितीन देशमुख यांनी दिला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या