Friday, July 3, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे : चिनी वस्तू फोडून चीनचा निषेध

पुणे : चिनी वस्तू फोडून चीनचा निषेध

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – ब्राह्मण महासंघाने पुण्यातील स्वा. सावरकर स्मारकासमोर चिनी वस्तू फोडून चीनचा निषेध केला. चीनने कोरोनाचा प्रसार जाणूनबूजून केला असल्याचा आरोपही ब्राह्मण महासंघाने केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच ठिकाणी विदेशी वस्तूंची होळी केली होती. ब्राह्मण महासंघाने चीनी वस्तूंच्या वापरावर बंदी घालणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या ठिकाणी विदेशी वस्तूंची होळी केली होती, त्याच ठिकाणी एकत्र जमत ब्राम्हण महासंघाने चिनी वस्तू वापरावर बंदी घालणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. चिनी वस्तू न वापरण्याची शपथ महासंघाने घेतली.

- Advertisement -

यावेळी बोलताना ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे म्हणाले, कोरोनासारखा आजार चीनने जाणीवपूर्वक पसरला असल्याचे संपूर्ण जगात सिद्ध होत आहे. जागतिक आरोग्य संघटनाही चीनने खिशात घातली आहे. हाच चीन आजूबाजूला असणार्‍या राष्ट्रांवर अतिक्रमण करत असतो. भारताच्या बाबतीतही चीनचे हेच धोरण आहे. चीनला भारताची गरज आहे. भारताला चीनची गरज नाही. हे दाखवून देण्यासाठी आजचे हे आंदोलन होते. आजच्या आंदोलनामुळे चिनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे प्रमाण वाढत जाईल आणि संपूर्ण भारतातून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जाईल.

आंदोलनावर संभाजी ब्रिगेडची टीका
ब्राह्मण महासंघाने चिनी वस्तूंची तोडफोड करत केलेल्या आंदोलनावर संभाजी ब्रिगेडने टीका केली आहे. ब्राह्मण महासंघाचे हे आंदोलन केवळ स्टंट असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. जर ब्राह्मण महासंघाला खरोखर चिनी वस्तूंच्या विरोधात आंदोलन करायचे असेल, तर त्यांनी आधी आपल्या हातातील चिनी मोबाईल, चिनी अ‍ॅप, घरातील पुजेचं चिनी साहित्य, घरातील टिव्ही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जाळावे, असा खोचक सल्ला संभाजी ब्रिगेडने दिला. तसेच सध्या कोरोना निदानासाठी वापरण्यात येणारे इन्फ्रा रे तापमापक, केंद्राने मागवलेल्या पीपीई किट या देखील चिनी असल्याचंही सांगत संभाजी ब्रिगेडला टोला लगावला.
संभाजी ब्रिगेडने आपल्या भूमिकेत म्हटले आहे, ब्राह्मण महासंघाने लोकांची दिशाभूल करु नये. चीनशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. कारण सगळ्यांना कमी किमतीत वस्तू खरेदी करायची सवय लागली आहे. चीन तुमच्या घरात घुसलेला आहे. तुमच्या घरातील सर्व वस्तू तपासा, त्या चीनच्या निघतील. केंद्र सरकारने सर्वप्रथम चीन सोबतचे सर्व व्यवहार बंद करावेत. भारतीय सैनिकांचे बुलेट-प्रुफ जॅकेट, चिनी अ‍ॅप, वस्तू आणि व्यवहार सर्वप्रथम बंद करावा. पण सरकार असं करणार नाही.

आमच्या वस्तूंशिवाय पर्याय नाही ; चीनने भारताला डिवचले

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...