Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजहिंदी भाषक लोकांविरोधात हिंसाचार भडकावल्याचा आरोप; राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका दाखल

हिंदी भाषक लोकांविरोधात हिंसाचार भडकावल्याचा आरोप; राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका दाखल

मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी हिंदी भाषक लोकांविरोधात हिंसाचार भडकावल्याचा आणि भाषेच्या आधारावर द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचिकाकर्ते वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी उपाध्याय यांनी केली आहे.

शुक्रवारी (१९ जुलै) राज ठाकरे यांची ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलतानाही राज ठाकरे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवरून चांगलेच आक्रमक झाले होते. ‘मराठी व्यापारी नाहीयेत का? महाराष्ट्रात राहताय, मराठी शिका, नीट व्यापार करा. मस्ती दाखवलीत तर दणका बसणार म्हणजे बसणार”, असा इशारा राज ठाकरे यांनी परप्रातियांना दिला. मात्र, राज ठाकरे यांनी भाषा वादावरून केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. राज ठाकरे यांनी हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

त्यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे याआधीच तक्रार दाखल केली होती. पण त्याची दखल घेतली नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या याचिकेत ५ जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्याचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. या मेळाव्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, या मेळाव्यात राज ठाकरे यांनी कथितपणे म्हटले होते की जे मराठी बोलत नाहीत त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे. असे वक्तव्य हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे आणि संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांची ही वक्तव्ये आणि कृती देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी आहे. हा भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १५२ नुसार दंडनीय गुन्हा आहे, असेही याचिकेत नमूद केले आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला कोणताही हिंसाचार आणि मॉब लिंचिंग विरोधात कठोर कारवाई करण्याचे तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठीचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणीही उपाध्याय यांनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत सोयाबीन व डाळिंबाला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी सोयाबीनला सर्वाधिक 7001 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 6 क्विंटल आवक झाली....