Friday, July 3, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे : मशिदीमध्ये वास्तव्यास असलेल्या 13 जणांवर गुन्हा

पुणे : मशिदीमध्ये वास्तव्यास असलेल्या 13 जणांवर गुन्हा

पुणे (प्रतिनिधी) – लॉकडाऊन जाहीर होण्याच्या अगोदरपासून रांची येथून येऊन पुण्यातील एका मशिदीमध्ये वास्तव्यास असलेल्या 13 जणांवर कलम 188 तसेच साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 अंमलबजावणी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी घेण्यात आली आहे. सुदैवाने सर्वांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींचा दिल्लीतील घटनेशी कोणताही संबंध नाही.

पोलिसांना एका मशिदीतून अजाणचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांना तेथे काही व्यक्ती मिळून आल्या. हे सर्वजण लॉकडाऊन होण्याच्या अगोदरच पुण्यात आल्याचे कळाले. मात्र नियमानुसार त्यांनी शहरात आल्यानंतर आपली माहिती पोलिसाना देणे बंधनकारक होते. परंतु त्यांनी पोलिसांना अशी कोणतीच माहिती न देता येथील मध्यवस्तीत एकत्र वास्तव्य केले. त्यानुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबत मशिदीच्या ट्रस्टीवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींचा दिल्लीतील घटनेशी कोणताही संबंध नाही. एका मशिदीच्या कामानिमित्ताने फेब्रुवारीमध्येच ते सर्व पुण्यात आले आहेत. तसेच या व्यक्तींनी मार्चमध्ये आपल्या गावी परतणे अपेक्षित होते. मात्र तसे त्यांनी केले नाही. लॉकडाऊन नंतर गावी जाणे शक्य झाले नसल्याने ते येथे आहेत. त्या व्यक्ती मशिदीत थांबल्या आहेत. याची माहिती पोलिस प्रशासनाला मशीद व्यवस्थापनाने देणे गरजेचे असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...