Thursday, July 2, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यातील मार्केटयार्ड उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद

पुण्यातील मार्केटयार्ड उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहरातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आडते असोसिएशन, कामगार युनियन, तोलणार संघटना आणि टेम्पो संघटना यांच्या कडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरातील विविध भागात कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केट यार्ड मधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत अशी विनंती आडते असोसिएशनकडून कृषी उत्पन्न बाजार समितीला करण्यात आली होती. त्यानुसार, उद्यापासून म्हणजेच 10 एप्रिल पासून फळे, भाजीपाला, केळीचा घाऊक व्यापार, कांदे बटाटे बाजार पुढील निर्णय येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
त्याचबरोबर आता फक्त भुसार बाजार चालू राहणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती कडून सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घरमालकांना लुटणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरासह (Nashik City) राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि परराज्यांत भाडेकरू म्हणून राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्याच घरात...