Saturday, July 4, 2026
Homeमहाराष्ट्रदेशात पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्क्यांनी जास्त

देशात पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्क्यांनी जास्त

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – देशाच्या मृत्युदरापेक्षा पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या महिनाभरापासून सातत्याने पुण्याचा मृत्युदर सर्वाधिक असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. 30 एप्रिल पर्यंत पुण्याचा मृत्यूदर 5.6 टक्के आहे. तर महाराष्ट्राचा मृत्युदर 4.4 टक्के आहे. तर देशाचा मृत्यूदर 3.3 टक्के आहे. पुण्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा प्रमाण काही केल्यानं कमी होत नाही. मात्र रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. 30 एप्रिल पर्यंत पुण्याचा मृत्युदर राज्यासह देशात सर्वाधिक असल्याचं आढळून आलाय. देशाच्या मृत्युदरा पेक्षा पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या महिनाभरापासून सातत्याने पुण्याचा मृत्युदर सर्वाधिक असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा 1828 असून मृतांच्या संख्येनं शतक गाठलं आहे तर पुण्यात आतापर्यंत 93 बाधित करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून 1611 रुग्ण आहेत. याच वाढत्या आकडेवारीमुळे मृत्यू दरही सर्वाधिक आहे.
30 एप्रिल पर्यंत पुण्याचा मृत्यूदर 5.6 टक्के आहे. तर महाराष्ट्राचा मृत्युदर 4.4 टक्के आहे. तर देशाचा मृत्यूदर 3.3 टक्के आहे. म्हणजेच देशाच्या मृत्युदरापेक्षा पुण्याचा मृत्यूदर जास्त आहे. भारतात आतापर्यंत एकूण रुग्ण 33 हजार 50 रुग्ण असून 1074 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात एकूण रुग्ण संख्या 9 हजार 915 असून 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात एकूण रुग्ण 1518 असून मृत्यू 85 रुग्णांचा झाला आहे.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यात करोनाबाधित मृतांची संख्या 101 वर
पुणे जिल्हयात 1 हजार 876 बाधीत रुग्ण असून 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुणे विभागातील 410 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 87 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 1 हजार 566 आहेत. विभागात करोनाबाधीत एकुण 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 2 हजार 87 बाधित रुग्ण असून 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 876 बाधीत रुग्ण असून 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 54 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 111 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 32 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 हजार 599 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 20 हजार 767 चा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 18 हजार 613 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 87 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...