Friday, June 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टाचा निकाल, नराधम भीमराव कांबळे दोषी

नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टाचा निकाल, नराधम भीमराव कांबळे दोषी

पुणे | Pune
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र दिनी साडेतीन वर्षीय चिमुरडीवर ६० वर्षाच्या नराधमाने गोठ्यात नेत अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यभरात संतापजनक पडसाद उमटले. आज पावणे दोन महिन्यांतच पुणे जिल्हा न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल लावला आहे. पुण्यातील विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला आहे. आरोपीला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.

१ मे २०२६ रोजी घडलेल्या या भयानक घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली होती. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी धाडसी कामगिरी करत विक्रमी वेळेत १,२०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. आरोपपत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात २१ मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावण सुरू झाली.

- Advertisement -

न्यायालयात काय घडलं?
राज्याच्या न्यायालयीन इतिहासात इतक्या वेगाने निकाल लागलेला हा पहिलाच खटला असल्याचं मानलं जातंय. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे याला पोलिसांनी अटक केली होती. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या खटल्याचा निकाल देत आरोपीला दोषी ठरवलं. यावेळी कोर्टात शिक्षेबाबत युक्तीवाद सुरु होता.

अंतिम सुनावणी न्यायालयाने आरोपी भिमराव कांबळे याला तुला कोणती शिक्षा द्यायची, फाशीची की जन्मठेपेची, अशी विचारणा केली. त्यावर मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो, त्या मुलीच्याही डोक्याला मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ती सारखी ओरडत असल्याचा बनाव केला. त्यावर विशेष न्यायाधीश साळुंखे यांनी त्याला तू जे सांगत आहे, तो इतिहास झाला आहे, तुझ्यावर आता गुन्हा सिद्ध झाला आहे, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने कोणतेच उत्तर दिले नाही.

न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भिमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले. गुन्हेगार ठरलेल्या भिमराव कांबळेला कोणती शिक्षा देण्यात यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तीवाद सुरु आहे. सरकारी वकिल युक्तीवाद करत आहेत आणि त्यांच्याकडून भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी करण्यात आली आहे.

सरकारी वकीलांचा युक्तीवाद
भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने ३९ मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकिय तपासणीत भिमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याच समोर आलं असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलं आहे. त्या लहान मुलीच्या अंगावर अठरा जखामा या आरोपीने लैंगिक अत्याचार करताना केल्या.

समाजात मुली आणि महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र असे कृत्य केले तर भितीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. आरोपीने फक्त वासनेसाठी हे कृत्य केलेले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल हे देखील न्यायालयात आलेत. सरकारी वकिलांकडून अशाच गंभीर गुह्याच्या खटल्यांचा आणि त्यामधे सुनावण्यात आलेल्या खटल्यांचा संदर्भ देण्यात येत आहेत. आरोपीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास हलण्याची भिती देखील सरकारी वकिलांनी व्यक्त केली आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी जेणेकरुन कोणताही गुन्हेगार गुन्हा करताना चारवेळा विचार करेल, अशी मागणी देखील सरकारी वकिलांनी केली आहे.

आरोपीला वाचवण्यासाठी त्याच कुटुंब देखील पुढं आलं नाही. कारण त्याच्या कुटुंबाने दोनवेळा सुधारण्याची संधी देऊनही तो सुधारला नाही. या गुन्हेगाराचे वय पाहता तो सुधारु शकत नाही. त्याच्या देह बोलीवरुन आजतागायत कोणताही पश्चाताप झाल्याच आढळून आलेलं नाही, शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील रेष देखील हललेली नाही, असंही सरकारी वकिलांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?
१ मे रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर ६५ वर्षीय भीमराव कांबळेने गुन्हा केल्याची कबुली पुणे ग्रामीण पोलिसांना दिली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर २ मे रोजी नसरापूर बंदही पाळण्यात आला.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक करण्यात आले. तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. या खटल्यात सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष, अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात २१ मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावण सुरू झाली.

चिमुरडीचा शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय तपासणी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. पोलिसांनी घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर महत्त्वपूर्ण भौतिक पुरावे जप्त केले. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला थेट घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्निर्मिती केली. त्याचे ‘डीएनए’ नमुने, साक्षीदारांचे जबाब आणि इतर शास्त्रीय आणि वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले.

ताज्या बातम्या

राम

Ram Mandir Donation Case: राम मंदिराच्या दान चोरी प्रकरणी मोठी घडामोड;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या(AyodhyaRamMandir) दान चोरी प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय आणि मोठे वळण मिळाले आहे. राम मंदिर ट्रस्टमधील...