Friday, April 25, 2025
Homeनगरपुणे-नाशिक महामार्गालगतच्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई

पुणे-नाशिक महामार्गालगतच्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई

जाहिरात एजन्सीसह जाहिरातदारांचे धाबे दणाणले

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

घाटकोपर येथे होर्डिंग्ज (फलक) कोसळल्याच्या घटनेतून धडा शिकलेल्या प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक असलेले पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगतचे (खेड ते सिन्नर) होर्डिंग्ज काढण्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पथकाने सुरुवात केली आहे. यामुळे होर्डिंग्ज लावणारे आणि जाहिरातदारांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

घाटकोपर येथे महाकाय फलक (होर्डिंग्ज) कोसळून चौदा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामुळे खडबडून जागे झालेल्या स्थानिक प्रशासनासह वरिष्ठ पातळीवरुनही याची गंभीर दखल घेतली गेली. त्यामुळे संपूर्ण राज्यभर अनधिकृत होर्डिंग्जचा विषय चर्चेला आला. आता त्यानुसार प्रशासनाने अनधिकृत आणि धोकादायक फलक काढण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहे. पावसाळ्याच्या तोंडावरच ही मोहीम सुरू झाली असून, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगतचे (खेड ते सिन्नर) होर्डिंग्ज भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पथकाकडून काढले जात आहे.

तत्पूर्वी संबंधितांना नोटिसा देऊन होर्डिंग्ज काढण्याचे आवाहन केले जाते. परंतु, त्या उपरांतही काढले नाही तर पथक ते होर्डिंग्ज काढून घेत आहे. आत्तापर्यंत हिवरगाव टोलनाका प्रशासनाच्या हद्दीतील दहा होर्डिंग्ज काढले आहे. यामुळे महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. पुढे देखील ही कारवाई सुरूच राहणार आहे. यामुळे संबंधितांनी तत्काळ अनधिकृत होर्डिंग्ज काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुणे ते नाशिकपर्यंत कारवाई करणार…
राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून तीस मीटर अंतरावर असलेले होर्डिंग्ज काढले जात आहे. सदर कारवाई पुणे ते नाशिकपर्यंत सुरू राहणार आहे. आमच्या हद्दीत अतिक्रमण होऊ द्यायचे नाही एवढाच आमचा उद्देश आहे.

– दिलीप शिंदे (तांत्रिक सल्लागार – भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे)

जाहिरात संस्था होताहेत मालामाल..
अगदी कमी पैशांच्या बदल्यात शेतकर्‍यांच्या जागेवर अनधिकृतपणे होर्डिंग्ज लावण्यासाठी जणू जाहिरात संस्थांची (एजन्सी) चढाओढ सुरू असते. त्यासाठी संबंधित कोणत्याही ग्रामपंचायत व नगरपालिकेची परवानगी न घेता अथवा कर न भरता होर्डिंग्ज लावतात. यात शेतकर्‍यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचाही महसूल बुडवतात. मात्र, जाहिरात संस्था यातून मालामाल होत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण राहत नसल्याने जाहिरात संस्थांचे चांगलेच फावत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ajit Pawar : “मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो...

0
पुणे(प्रतिनिधी) आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असल्याचे सांगितलं. मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो आणि कामाला सुरुवात करतो. साधारण १० ते ११...