Friday, February 20, 2026
HomeनगरSangamner : पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर-अकोले-देवठाण मार्गेच व्हावा

Sangamner : पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर-अकोले-देवठाण मार्गेच व्हावा

संगमनेरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुनरुच्चार

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

पुणे-नाशिक रेल्वेमार्गाबाबत 2019 साली जाहीर झालेल्या संगमनेर-चिखली-अकोले-देवठाण या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या सर्वेनंतर त्यात झालेल्या बदलांबाबत राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. हा रेल्वेमार्ग मूळ सर्वेनुसारच व्हावा यासाठी आपण केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे ठाम आग्रह धरणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

- Advertisement -

संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (दि.19) सायंकाळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी आमदार अमोल खताळ, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ना. विखे पाटील पुढे म्हणाले, 2019 मध्ये संगमनेर-चिखली-अकोले-देवठाण असा रेल्वेमार्गाचा प्राथमिक सर्वे करण्यात आला होता. त्यावेळी महारेलचे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी होते. सर्वे पूर्ण झाल्यानंतर 2021 मध्ये मार्गात बदल झाल्याचे समोर आले; मात्र हा बदल नेमका कोणी आणि कोणत्या कारणास्तव केला, याबाबत स्पष्ट माहिती नाही. मूळ आराखड्यानुसार कामाला सुरुवात होण्याची तयारी झाली होती. प्रकल्पासाठी लागणार्‍या भू-संपादनापैकी 50 टक्के हिस्सा राज्य सरकार उचलणार, असे ठरले होते. यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यावर कार्यकारी संचालकांची नियुक्तीही करण्यात आली होती.

YouTube video player

त्यामुळे प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती, परंतु, रेल्वेमंत्र्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथील जीएमआरटी संदर्भातील काही अडचणींचा मुद्दा उपस्थित केला होता. आता रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण प्रस्ताव तपासून पाहण्यास सांगितले आहे. सर्व नकाशे आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी मी स्वतः बैठक घेणार आहे. या आठवड्यात अधिवेशन सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर रेल्वे अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे. जे सगळे नकाशे आणि कागदपत्रे आहेत, ती तपासा, त्यानंतर आपण ठोस भूमिका घेऊ. मात्र रेल्वेमार्ग मूळ सर्वेनुसारच व्हावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

ताज्या बातम्या

भिवंडीचा महापौर सेक्युलर फ्रंटचा होईल – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai भिवंडी महापालिकेची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवली आणि पक्षाचे सर्वात जास्त ३० नगरसेवक निवडून झाले. काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या १२...