Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPune News: शिंदे गटाच्या उमेदवाराचा अजब कारनामा; आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एबी...

Pune News: शिंदे गटाच्या उमेदवाराचा अजब कारनामा; आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एबी फॉर्म गिळला

पुणे | Pune
राज्यात आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांबरोबर पक्षांतर्गत स्पर्धाही तीव्र झाली आहे. २९ महापालिकांच्या निवडणुकांत राजकीय पक्षांची जोरदार चढाओढ सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी अर्ज भरण्याची मुदत संपली असून अनेक ठिकाणी राजकिय नाट्य पहायला मिळाले. आज आणि उद्या माघारीचा दिवस आहे, मात्र त्याआधीच पुण्यात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या एका उमेदवाराने आपल्याच पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराचा ‘एबी’ फॉर्म चक्क खाऊन गिळल्याची घटना सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात घडली.

पुणे महानगरपालिका निवडणुकी भाजप आणि शिवसेनेची युती होणार होती. मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने त्या दोघांची युती फिस्कटली. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना शिंदे गटाने पुण्यातील पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक ३६ ड गटातून मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे या दोघांना एबी फॉर्म दिले. त्यामुळे या दोघांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह ३० डिसेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उद्धव कांबळे यांना समजले की, पक्षाकडून आपल्या प्रभागातून मच्छिंद्र ढवळे यांना देखील एबी फॉर्म देण्यात आला आहे. तसेच मच्छिंद्र ढवळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आपल्या आधी भरला आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरू शकतो, हे उद्धव कांबळेच्या लक्षात आले.

- Advertisement -

ठाकरे बंधुंचा वचननामा ४ तारखेला प्रसिध्द होणार; मुंबईसह ‘या’ भागांत उध्दव-राज ठाकरेंच्या संयुक्त सभा

यावेळी उद्धव कांबळे यांनी त्यांच्या प्रभागातील सर्व उमेदवारांचे अर्ज पाहण्यासाठी मागितले. नियमानुसार त्याचा तो अधिकार होता. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रभागातील अर्जांचा गठ्ठा त्यांना पाहण्यासाठी दिला. उमेदवारी अर्जांचा गठ्ठा मिळाल्यावर उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्या निवडणूक अर्जासोबत जोडलेला पक्षाचा एबी फॉर्म फाडला. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उद्धव कांबळे बाथरुमच्या दिशेने पळाले आणि मच्छिंद्र ढवळे यांचा उमेदवारी अर्ज स्वत: तोंडात कोंबून गिळून टाकला. दरम्यान, या प्रकरणी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...