Thursday, May 7, 2026
Homeमुख्य बातम्याPune News : मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; दोघांचा मृत्यू, २० ते...

Pune News : मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; दोघांचा मृत्यू, २० ते २५ जण वाहून गेल्याची भीती

पुणे | Pune 

पुणे जिल्ह्यातील मावळमधील (Maval) तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) जवळीस प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणाऱ्या कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत पर्यटनासाठी आलेले २० ते २५ जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. तर या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी दिली असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवार (Sunday) असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक कुंडमळा (Kundmala) येथील इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलावर (Bridge) उभे होते. यावेळी हा जुना पूल कोसळल्याने अनेक जण वाहून गेले. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे (NDRF) पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. तसेच या ठिकाणी अग्निशमन दल देखील पोहोचले आहे. तसेच या ठिकाणी अजूनही काही पर्यंटक (Tourist) अडकले असून, त्यांना वाचवले जात आहे. तर या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन पोलिसांनी (Police) केले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ मे २०२६ – तामिळनाडूचा नवा जननायक

0
तामिळनाडूच्या राजकारणाने गेल्या सहा दशकांपासून एक ठराविक साचा जोपासला होता. १९६७ नंतर या राज्याने ‘द्रविडीयन’ विचारधारेच्या पलीकडे जाऊन कधी विचार केला नाही. अण्णा दुराई,...