दिल्ली । Delhi
भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पी.व्ही. सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
राजस्थानमधील उदयपूर येथे 22 डिसेंबरला होणार आहे तसेत हैदराबादमध्ये 24 डिसेंबरला तिच रिसेप्शन होणार आहे. तिच्या जोडीदारा चे नाव व्यंकट दत्ता साई असे आहे. पी.व्ही. सिंधूचा जोडीदार व्यंकट दत्ता साई यांनी जेएसडब्ल्यू आणि सोलर अॅपल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये काम केले असून ते पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहे.
तर त्यांच्या या कंपनीचा नवीन लोगो पी. व्ही. सिंधूने गेल्या महिन्यात लॉन्च केला होता. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांसारख्या मोठ्या बँकांसाठी जलद कर्ज प्रक्रिया आणि क्रेडिट स्कोअर जुळण्यासारख्या सुविधा प्रदानचे काम व्यंकट दत्ता साई करतात. त्याचसोबत टी20 लीग, आयपीएल या स्पर्धांसोबत पण त्यांचे नाव जोडलेले आहे.
पी.व्ही. सिंधू काही काळ खराब फॉर्मशी झुंजत होती आणि ऑलिम्पिकमध्येही ती काही विशेष दाखवू शकली नाही. मात्र आता सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून तिनं आपला वेग पुन्हा मिळवला असून आगामी काळात तिला अनेक मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत, ज्यात भारतीयांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. सिंधूनं राष्ट्रकुल स्पर्धेतही दोन सुवर्णपदकं जिंकली आहेत.