Tuesday, September 8, 2026
Homeनगरपिसाळलेल्या कुत्र्याने घेतला वृद्धाचा बळी

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला वृद्धाचा बळी

10 ते 15 जण जखमी

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा (Chincholi Phata) परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ (Dog Attack) घालत एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी (Senior Citizens Death) घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात साहेबराव राघुजी वाघमारे (वय 70) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे 10 ते 15 नागरिक जखमी (Injured) झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, वाघमारे हे आपल्या घरासमोरील दुकानाजवळ झोपलेले असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला (Dog Attack) चढवला. गंभीर जखमी झालेल्या वाघमारे यांना तातडीने जीवनदायी अ‍ॅम्ब्युलन्सचे निखिल भोसले यांनी राहुरी (Rahuri) येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान त्याच कुत्र्याने परिसरातील इतर नागरिकांवरही हल्ला करत सुमारे 15 जणांना चावा घेतला. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच चिंचोलीचे सुरेश लाटे, स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पशुवैद्यकीय विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित पथकाकडून पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावकर्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देत कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...