राहाता |वार्ताहर| Rahata
येथील बसस्थानकात (Bus Stand) एसटी बस घेऊन येणार्या बस चालक (Bus Driver) व कंडक्टर (Conductor) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करून शिवीगाळ व दमबाजी करणार्या येवला पोलीस ठाणे (Yeola Police Station) येथे नेमणूकीस असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल व त्यांच्या बरोबर असलेल्या तीन व्यक्ती विरोधात राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेचे रक्षक समजले जाणार्या पोलीस कर्मचार्याने अशी वर्तणूक केल्यामुळे पोलीस खात्याचे नाव बदनाम होत असण्याची चर्चा पोलिस व नागरिकांमध्ये दिसून आली.
याबाबत राहाता पोलीस ठाण्यात बस कंडक्टर (Bus Conductor) बालाजी पंडितराव बोरगावकर व चालक विकास बालाजी मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, रविवारी एक मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान राहाता बसस्थानकात एसटी बस क्रमांक एमएच 24 एयु 7970 घेऊन येणारे चालक विकास मुंढे व कंडक्टर बालाजी बोरगावकर यांना सध्या येवला पोलीस ठाणे (Yeola Police Station) येथे नेमणुकीस असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात व सार्थक संजय बनसोडे व त्यांच्याबरोबर असलेल्या दोन व्यक्तींनी एसटी बस चालक व कंडक्टर यांना शिवीगाळ दमबाजी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) करून बस चालक यांच्या सरकारी गणवेशाचा खिसा फाडला. मारहाणीत बस चालक यांना मार लागलेला आहे.
तसेच पोलिसांना देखील दमबाजी करून मी पोलीस आहे. तुमच्यावर तसेच पोलीस उपनिरीक्षक लेंडे व पोलीस ठाणे अंमलदार बर्डे यांना तुम्हाला सर्वांना कामाला लावून टाकेल व तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. फिर्यादी हे शासकीय कर्तव्य पार पाडत असताना कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात व त्यांच्याबरोबर असलेल्या तीन व्यक्ती विरोधात 132, 121 (1) 351 (2) 352,3 (5) कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक कुमावत करत आहेत.




