Wednesday, February 19, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांदा (Onion) तसेच पेरूची (Guava) चांगली आवक झाली. राहाता बाजार समितीत कांद्याच्या 8084 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला किमान प्रतीक्विंटलला 2800 रुपये तर जास्तीत जास्त 4000 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1900 रुपये ते 2750 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1000 रुपये ते 1850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 2200 ते 2600 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 600 ते 800 रुपये असा भाव मिळाला.

- Advertisement -

सीताफळाच्या 4 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 1000 रुपये, जास्तीत जास्त 4000 रुपये तर सरासरी 2500 रुपये. पेरूच्या (Guava) 260 कॅरेटची आवक झाली. पेरू (Guava) 500 ते 1350 रुपये, तर सरासरी 1000 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला. संत्रीच्या 7 कॅरेटची आवक झाली. संत्रीला 2000 ते 3125 रुपये, तर सरासरी 2500 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला. पपईच्या 97 कॅरेटची आवक झाली. पपईला 375 रुपये ते 550 रुपये तर सरासरी 400 रुपये. बोर 250 ते 2500 रुपये, तर सरासरी 2000 रुपये.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या