Thursday, November 19, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील कांदा व डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील कांदा व डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 300 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता बाजार समिती 10437 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 2400 ते 3200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 1400 ते 2350 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1350 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 1700 रुपये. जोड कांदा (Onion) 300 ते 700 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत मंगळवारी डाळिंबाच्या 3378 क्रेटस्ची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 191 ते 300 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 121 रुपये ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 61 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये भाव मिळाला. पेरूच्या 93 क्रेटस् ची आवक झाली. पेरुला (Guava) 9 ते 32 रुपये तर सरासरी 25 रुपये प्रति किलोला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सहा महिन्यात 42 आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नियमांचे पालन न करणार्‍या जिल्ह्यातील 42 आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या...