राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 205 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) बाजार समिती 9001 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 2400 ते 3200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1400 ते 2350 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 500 ते 1350 रुपय े भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 500 ते 2000 रुपये. जोड कांदा 400 ते 1100 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 7918 क्रेटस् ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 ते 205 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 81 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 रुपये ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 4 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybean) 7200 ते 7380 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 7290 रुपये भाव मिळाला. गव्हाची 4 क्विंटल ची आवक झाली. गव्हाला सरासरी 2515 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.




