राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. राहाता बाजार समिती 4645 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 4000 ते 5200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2500 ते 3950 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1200 ते 2450 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1500 ते 3800 रुपये. जोड कांदा 700 ते 1600 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
डाळिंबाची (Pomegranate) 4589 क्रेटस् ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 191 ते 350 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 131 ते 190 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 71 ते 130 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 70 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




