राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला सर्वाधिक 3200 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) एकूण 3051 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2600 ते 3200 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1700 ते 2550 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 800 ते 1650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 2000 ते 2400 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 400 ते 800 रुपये भाव मिळाला.
गव्हाला 2975 ते 3000 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 2990 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) 3800 ते 3899 रुपये तर सरासरी 3850 रुपये भाव मिळाला. हरभरा 5160 ते 5491 रुपये तर सरासरी 5325 रुपये भाव मिळाला. कोल्हार उपआवारात तुरीला 6699 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) 3921 रुपये सरासरी भाव मिळाला. मकाला सरासरी 2100 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.