Wednesday, June 10, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंब व कांद्याचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंब व कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी डाळिंबाला सर्वाधिक 255 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 1535 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 176 रुपये ते 255 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 111 ते 175 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 56 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 55 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.

- Advertisement -

कांद्याची 7225 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 1100 ते 1400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोनला 800 ते 1050 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 400 ते 900 रुपये. जोड कांदा 150 ते 300 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 25 गोण्यांना 1301 ते 1400 रुपये भाव मिळाला. 173 गोण्यांना 1201 ते 1300 रुपये भाव मिळाला. 186 गोण्यांना 1101 ते 1200 रुपये भाव मिळाला. 304 गोण्यांना 1001 ते 1100 रुपये भाव मिळाला. 2825 गोण्यांना 501 ते 1000 रुपये भाव मिळाला. 3712 गोण्यांना 100 ते 500 रुपये भाव मिळाला, अशी सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या