Friday, June 26, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीतील डाळींब व सोयाबीनचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील डाळींब व सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळींबाला (Pomegranate) 175 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींबाच्या 323 कॅरेटची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला किमान 81 रुपये तर जास्तीत जास्त 175 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला किमान 56 रुपये तर जास्तीत जास्त 80 रुपये. डाळींब नंबर 3 ला किमान 21 ते जास्तीत जास्त 55 रूपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला किमान 10 रुपये तर जास्तीत जास्त 20 रुपये असा भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाला सरासरी 2400 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) किमान 3900 ते 4275 रुपये, तर सरासरी 4200 रुपये. ज्वारीला सरासरी 1941 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2000 रुपये. कोल्हारला किमान 2926 रुपये, जास्तीत जास्त 3055 रुपये, तर सरासरी 3000 रुपये. सिताफळाच्या 281 कॅरेटची आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान 500 ते 5750 रुपये तर सरासरी 3000 रुपये. पेरुच्या (Guava) 42 क्रेटसची आवक झाली. पेरुला सरासरी 1000 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगरमध्ये आणखी चार दिवस येलो अलर्ट

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत मयेलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पावसाने प्रामुख्याने...