Friday, June 26, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळिंब व सोयाबीनला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत डाळिंब व सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला (Pomegranate) जास्तीत जास्त 150 रुपये प्रति किलोलोला भाव मिळाला. डाळिंबाची 365 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 81 ते 150 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 46 रुपये ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 21 ते 45 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 20 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

सीताफळाच्या 413 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 1000 रुपये, जास्तीत जास्त 6000 रुपये तर सरासरी 4000 रुपये प्रतीक्विंटल भाव मिळाला. पेरूच्या 12 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) 500 ते 1750 रुपये, तर सरासरी 1500 रुपये. संत्रीच्या 18 कॅरेटची आवक झाली. संत्री ला 1000 ते 3250 रुपये, तर सरासरी 2000 रुपये भाव प्रतिकिलोला मिळाला. सोयाबीनची 22 क्विंटल आवक झाली.

सोयाबीनला (Soybeans) 4000 ते 4271 रुपये तर सरासरी 4200 रुपये भाव मिळाला. मकाला 1900 ते 2100 रुपये तर सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. ज्वारीला 1650 ते 1865 रुपये तर सरासरी 1750 रुपये भाव मिळाला. हरभरा (डंकी ) 4000 रुपये सरासरी भाव मिळाला. गव्हाला 2825 ते 3190 रुपये तर सरासरी 3050 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगरमध्ये आणखी चार दिवस येलो अलर्ट

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत मयेलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पावसाने प्रामुख्याने...