Sunday, June 14, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला (Pomegranate) प्रति किलो सर्वाधिक 255 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 6,481 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 151 ते 225 रुपये भाव मिळाले. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 150 रुपये भाव मिळाले. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 90 रुपये भाव मिळाले. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलो भाव मिळाला.

- Advertisement -

हरभर्‍याची (Gram) 7 क्विंटल आवक झाली. हरभरा सरासरी 5,580 रुपये प्रति क्विंटल. सोयाबीनची 17 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4,380 रुपये, जास्तीत जास्त 4,389 रुपये तर सरासरी 4,385 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 2,149 रुपये भाव मिळाले.

सीताफळाच्या 56 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 15 रुपये, जास्तीत जास्त 55 रुपये तर सरासरी 35 रुपये भाव मिळाले. संत्रीला किमान 5 रुपये, जास्तीत जास्त 30 रुपये तर सरासरी 20 रुपये भाव मिळाले. पेरूची 103 कॅरेटची आवक झाली. पेरूला प्रति किलो किमान 10 रुपये, जास्तीत जास्त 30 रुपये, तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला, अशी माहिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...