राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 175 रुपये भाव मिळाला. बाजार समिती 10077 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 2300 ते 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1300 ते 2250 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1250 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 2000 रुपये. जोड कांदा (Onion) 400 ते 1000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 10740 क्रेटस्ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 ते 175 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 81 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 रुपये ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2400 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला (Soybean) सरासरी 6700 रुपये भाव मिळाला. तर तुरीला सरासरी 7500 रुपये भाव मिळाला.




