Monday, August 24, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याच्या भावात वाढ

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याच्या भावात वाढ

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 175 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) 5105 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 3600 ते 5000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2300 ते 3550, कांदा (Onion) नंबर 3 ला 1000 ते 2250, गोल्टी कांदा 1500 ते 3500, जोड कांदा 600 ते 1400 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 11301 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 175 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik News : पिकअपची दुचाकीला धडक; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati राँग साईडने भरधाव वेगात आलेल्या पिकअपने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी...