नवी दिल्ली | New Delhi
रायझिंग स्टार पुरुष आशिया चषक (Rising Stars Asia Cup 2026) क्रिकेट स्पर्धेत आज (मंगळवार दि. २४ नोव्हेंबर) रोजी भारतीय संघाचा (Team India) सामना संयुक्त अरब अमिराती (यूएई) सोबत पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संयुक्त अरब अमिरातीने भारतासमोर २४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने जोरदार फटकेबाजी त्याचे क्रिकेट इतिहासातील पहिले द्विशतक पूर्ण केले. त्याने ५२ चेंडूत २०४ धावा केल्या. यानंतर भारताने १४.२ षटकांत २५४ धावा पूर्ण करत संयुक्त अरब अमिरातीवर ७ गडी राखून विजय मिळविला.
वैभवची वादळी फलंदाजी
वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) सुरुवातीला १६ धावांमध्ये अर्धशतक पूर्ण केले. तर अभिषेक शर्मा १२ आणि प्रभसिमरन सिंह ३ धावा करुन बाद झाले. मात्र, रिंकु सिंगने एक बाजू सांभाळून धरत दुसऱ्या बाजूने वैभव सूर्यवंशीने तुफानी फलंदाजी करत यूएईच्या गोलदाजांची चांगलीच धुलाई केली. वैभवच्या वादळी फलंदाजीमुळे भारताने पाच षटकांत १०० धावांचा टप्पा गाठला होता. तर २८ चेंडूत १०३ धावा करत त्याने शतक पूर्ण केले. त्यानंतर तो २०४ धावा करून बाद झाला. तर रिंकू सिंगने २७ धावांवर नाबाद राहिला.
दरम्यान, यूएईने भारताविरोधात फलंदाजी करताना २४९ धावा केल्या होत्या. त्यांच्या डावाची सुरुवात खराब झाली होती. पहिल्या षटकात त्यांनी आर्याशंची विकेट गमावली. तर सहाव्या षटकात शाहदाद ४६ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. याशिवाय एथन डिसूजाने ३७ चेंडूत २५ धावा केल्या. तसेच हरप्रीत सिंह भाटियाने १४४ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १३० धावा केल्या. यामुळे यूएईचा संघ २४९ धावांपर्यंत पोहोचू शकला. भारताकडून अरशद खानने ४ गडी बाद केले.
भारत उपांत्य फेरीत
भारतानं आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत पहिल्या सामन्यात नेपाळवर मोठा विजय मिळवला होता. तर, पाकिस्तान विरोधातील सामन्यात भारताचा ४८ धावांनी पराभव झाला होता. यूएईला नेपाळनं ६ गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर आता भारताने यूएईचा पराभव केल्याने ४ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचला आहे.




