राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) 7840 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 3000 ते 4200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1900 ते 2950 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 800 ते 1850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1300 ते 2800 रुपये. जोड कांदा 600 ते 1400 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 10910 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 185 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 130 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 90 रुपये. डाळिंब (Pomegranate)नंबर 4 ला 10 ते 50 रुपये. ड्रॅगन फ्रूटच्या (Dragon Fruit) 231 कॅरेटची आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला (Dragon Fruit) 20 ते 60 रुपये तर सरासरी 45 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




