Thursday, October 29, 2026
HomeनगरPomegranate Rate : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

Pomegranate Rate : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 205 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. गुरुवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2775 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 131 ते 205 रुपये. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.

- Advertisement -

सोयाबीनची (Soybean) 69 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybean) किमान 6500 रुपये, जास्तीत जास्त 6900 रुपये तर सरासरी 6750 रुपये भाव मिळाला. बाजरीची 1 क्विंटल ची आवक झाली. बाजरीला सरासरी 2101 रुपये भाव मिळाला. हरभर्‍याची 3 क्विंटल ची आवक झाली. हरभर्‍याला सरासरी 6600 रुपये भाव मिळाला.

संत्रीच्या 37 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला 5 ते 28 रुपये तर सरासरी 15 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सीताफळाची 85 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला 10 ते 75 रुपये तर सरासरी 40 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) 71 क्रेट्सची आवक झाली. ड्रॅगन फ्रुट ला 15 ते 70 रुपये, तर सरासरी 40 रुपये किलोचा भाव मिळाला. पेरूची 5 क्रेट्सची आवक झाली. पेरूला प्रतिकिलोला सरासरी 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सचिवांना; प्रमाणपत्र देण्यावरील स्थगिती उठवली

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सहसचिव, उपसचिवांकडून काढून घेत ते आता विभागाच्या सचिवांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने...