Friday, May 29, 2026
HomeनगरRahata Crime News : डोक्यात फरशी घालून पित्याची हत्या; मारेकरी मुलगा जेरबंद

Rahata Crime News : डोक्यात फरशी घालून पित्याची हत्या; मारेकरी मुलगा जेरबंद

राहाता (वार्ताहर)

- Advertisement -

दारूच्या नशेत मुलाने बापाच्या डोक्यात फरशी टाकून पित्याला ठार मारण्याचा प्रकार राहता शहरात शुक्रवारी रात्री घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बापाला ठार मारणाऱ्या मुलाला पोलिसांनी तात्काळ अटक करून त्याला जेरबंद केले आहे तर मयत झालेल्या व्यक्तीचे नाव उत्तम खैरे आहे. राहाता शहरात घोलप मंगल कार्यालय शेजारील परिसरात एका मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मुलगा सचिन खैरे हा आपल्या वडील उत्तम खैरे यांना वारंवार मारहाण करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. कुटुंबातील वाद आणि सततचा त्रास यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण असल्याचीही माहिती समोर येत आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास, आरोपी सचिन खैरे हा दारूच्या नशेत होता. यावेळी त्याने संतापाच्या भरात वडील उत्तम खैरे यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केली. या भयानक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ राहाता पोलिस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक लेंडे व कोमल कुमावत यांनी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ आरोपी सचिन खैरे याला ताब्यात घेतले आहे. मृतदेह पंचनामा करून पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांकडून तपास सुरू असून, नेमके कारण काय याचा शोध घेतला जात आहे. कुटुंबातील वाद, दारूचे व्यसन आणि सततचे भांडण हे या घटनेमागील कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे राहाता शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत राहाता पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

0
ओझे | वार्ताहर Oze लखमापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहेगाव येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी...