Friday, August 21, 2026
Homeदेश विदेशविद्यार्थ्यांवर पॅलेट गन कोणी चालवली? FIR का दाखल करत नाही?राहुल गांधींचं ठिय्या...

विद्यार्थ्यांवर पॅलेट गन कोणी चालवली? FIR का दाखल करत नाही?राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जंतर-मंतरवर गेल्या २० जुलै रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान सुरक्षारक्षक आणि पोलिसांकडून कथित ‘पॅलेट गन’चा वापर करण्यात आल्याचा मुद्दा आता अधिक तापला आहे. हाच मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्याला भेट दिली आणि डीसीपी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेल्या पेलेट गनबद्दल राहुल गांधी वारंवार प्रश्न उपस्थित करत आहेत. आज या प्रकरणाच्या तपासाची चौकशी करण्यासाठी त्यांनी डीसीपी कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर एफआयआर दाखल करत नसल्यामुळे ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी डीसीपी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी पेलेट गनचा वापर केला होता. या पेलेट गनमुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या पेलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी साहिल लोचव याला घेऊन राहुल गांधी हे पोलिस ठाण्यात पोहचले. राहुल गांधी यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीबद्दल आणि त्यांनी आतापर्यंत काय कारवाई केली याबद्दल विचारणा केली. या मागणीसाठी राहुल गांधी यांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनास बसले आहे.

- Advertisement -

सरकारी शाळेच्या पाहणीला गेलेल्या CJPच्या टीमवर तुफान दगडफेक; जयपूरमध्ये सकाळीच मोठा राडा!

पीडित कुटंबासोबत राहुल गांधींचा ठिय्या
संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल करून चौकशीची जोरदार मागणी केली. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर कारवाई करताना नक्की कोणत्या सुरक्षारक्षकांनी भाग घेतला होता, पॅलेट गन वापरण्याची परवानगी कोणी दिली होती आणि यासाठी जबाबदार अधिकारी कोण आहेत, याचा छडा पोलिसांनी लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता या प्रकरणाची कायदेशीर आणि वैद्यकीय तपासणी व्हावी, यासाठी राहुल गांधी स्वतः पीडित कुटुंबासोबत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले आहेत.

या प्रकरणी एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत आपण इथेच थांबणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी सुप्रीम कोर्टाने माजी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर आणि देशाच्या इतर भागांमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलिस अत्याचारांच्या आरोपांची चौकशी करणार आहे.

ताज्या बातम्या

आजच्या पिढीनं न बोलणंच उत्तम; काँग्रेसमधील सुसंवादावरून नाना पटोलेंनी सुप्रिया सुळेंना...

0
मुंबई | Mumbai २०१४ च्या राजकीय घडामोडींवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या...