नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेच्या सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक करणे तसेच सरकारी अधिकाऱ्यांना लाच देणे, असे आरोप गौतम अदानींवर करण्यात आले आहेत. यावरून आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अदानींना आजच अटक करा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. अदानींना अटक करायला हवी, पण पंतप्रधान मोदी हे करू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये अदानींना अटक करण्याची ताकद नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले, “भाजपाला मिळणारा सगळा निधी हा अदाणींकडून येतो. भाजपाचे आर्थिक व्यवहार त्यांच्याच हातात आहेत. पंतप्रधानांनी ठरवलं तरी ते अदाणींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत. अदाणी यांनी देश बळकावला आहे. देश त्यांच्या मुठीत आहे. देशातील विमानतळे, बंदरे, संरक्षण यंत्रणा अदाणींच्या ताब्यात आहे. सगळीकडे अदाणींची केंद्र सरकारबरोबर भागिदारी आहे. एका बाजूने अदाणी आणि दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी मिळून आपला देश लुटत आहेत. मोदी व भाजपा त्यांच्या पापात सहभागी आहेत. त्यामुळे मोदी त्यांना अटक करणार नाहीत. मुळात मोदींमध्ये तेवढी हिंमत व क्षमता नाही. कारण ज्या दिवशी मोदी व आपलं सरकार गौतम अदाणी यांना अटक करेल. त्या दिवशी मोदी देखील तुरुंगात जाऊ शकतात”.
पुढे ते असे ही म्हणाले, “गौतम अदाणी फसवणूक प्रकरणावर आम्ही गप्प बसणार नाही. हा मुद्दा आम्ही संसदेतही मांडणार आहोत. भाजप सरकार अदाणींना वाचवेल, हेही आम्हाला माहिती आहे. अदानी यांनी २ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, तरीही त्यांना अटक केली जात नाही, असे अमेरिकन तपास संस्थेने म्हटले आहे. अदाणी आताही तुरुंगाबाहेर का आहेत? त्यांना तात्काळ अटक करावी. त्यांच्यावरील आरोपांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी”, असे राहुल गांधी म्हणाले.
जेपीसी चौकशी व्हायलाच हवी.अदानी तुरुंगाबाहेर का आहेत. कोणीही गुन्हा केला तर नरेंद्र मोदी तुरुंगात टाकता अमेरिकेने म्हटलेय की इथे लाच देऊन कंत्राट मिळवलेय. तरी पंतप्रधान मोदी काही करू शकत नाहीत. त्यांना वाटले तरी काही करू शकत नाहीत. कारण ते अदाणींच्या हातात आहेत. घोटाळा केलाय २ हजार कोटींचा. पण ना तपास होईल, ना अटक होईल. कारण मोदींचा यांच्याशी संबंध आहे असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा