Sunday, June 21, 2026
Homeदेश विदेशRahul Gandhi: राहुल गांधींचा भाजप-आरएसएसवर निशाणा; म्हणाले, गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये,...

Rahul Gandhi: राहुल गांधींचा भाजप-आरएसएसवर निशाणा; म्हणाले, गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये, असे भाजप आणि आरएसएसला वाटते

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर इंग्रजी भाषेवरुन जोरदार टीका केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला. ‘भारतातील गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये, असे भाजप आणि आरएसएसला वाटते.’ परंतु इंग्रजी भाषा हे एक हत्यार आहे, ते साखळदंड तोडण्याचे साधन आहे, असे राहुल गांधी म्हणालेत.

इंग्रजी हे धरण नाही तर एक पूल
इंग्रजी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना राहुल गांधी म्हणतात, ‘इंग्रजी हे धरण(अडथळा) नाही, तर एक पूल आहे. इंग्रजी लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही, तर ती एक शक्ती आहे. इंग्रजी ही साखळदंड नाही, तर ती साखदंड तोडण्याचे साधन आहे. आजच्या जगात इंग्रजी ही व्यक्तीच्या मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे. ही भाषा केवळ रोजगाराच्या संधी निर्माण करत नाही, तर आत्मविश्वासही वाढवते.’

- Advertisement -

प्रत्येक मुलाला समान व्यासपीठ देण्याचा मार्ग
भारतातील प्रत्येक भाषेत आत्मा, संस्कृती, ज्ञान आहे. आपण त्यांचे पालनपोषण केले पाहिजे. प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजे. जागतिक स्पर्धेत भारताला मजबूत बनवण्याचा आणि देशातील प्रत्येक मुलाला समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हाच मार्ग असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

जर गरीब मुले इंग्रजी भाषा शिकले तर ते प्रश्न विचारतील. नंतर त्यांच्याशी बरोबरी करतील त्यामुळे गरीब मुलांनी इंग्रजी शिकू नये, असे भाजप आणि आरएसएसला वाटते असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. इंग्रजी हे एक शस्त्र आहे. जर तुम्ही इंग्रजी शिकलात तर तुम्ही कुठेही प्रवेश करू शकता. जर तुम्ही इंग्रजी शिकलात तर तुम्ही अमेरिका, जपान आणि इतर कुठेही जाऊ शकता. तुम्ही कुठेही काम करू शकता, असे राहुल गांधी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

अमित शाह काय म्हणाले होते?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा म्हणाले होते की, भारतात लवकरच असा काळ येईल, जेव्हा इंग्रजी भाषिकांना स्वतःची लाज वाटेल. अशा समाजाची निर्मिती फार दूर नाही. तुम्ही तुमची संस्कृती, धर्म आणि इतिहास परदेशी भाषेत समजू शकत नाही. आपल्या देशाच्या भाषा आपले रत्न आहेत. २०४७ मध्ये भारत जगात अव्वल स्थानावर येण्यात आपल्या भाषा महत्त्वाची भूमिका बजावतील. गृहमंत्र्यांचे हे विधान माजी आयएएस आशुतोष अग्निहोत्री यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी देण्यात आले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

default-featured-image

Maharashtra Monsoon Update : दिलासादायक! रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय; ‘या’ तारखेपासून...

0
मुंबई | Mumbai जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरीही संपूर्ण महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता कडक ऊन आणि असह्य उकाड्याने त्रस्त आहे. मात्र, आता राज्यातील जनतेसाठी एक...