Sunday, October 18, 2026
HomeनगरRahuri : राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवार रिंगणात

Rahuri : राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवार रिंगणात

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र अखेर ही निवडणूक लागल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाजपसोबतच, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी आणि काही अपक्ष असे 7 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

- Advertisement -

23 एप्रिल रोजी होणार्‍या या पोटनिवडणुकीसाठी एकूण 30 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत 7 अर्ज अपात्र ठरले. त्यानंतर 9 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी 16 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यामध्ये भाजपकडून अक्षय शिवाजीराव कर्डिले, शरद पवार गटाकडून गोविंद खंडू मोकाटे, वंचित बहुजन आघाडीकडून संतोष एकनाथ चोळके यांचा समावेश आहे. याशिवाय रावसाहेब सदाराम खेवरे, अ‍ॅड. अथर्व साहेबराव म्हसे, सुरेश दत्तात्रय लांबे, आणि महेश केशव हापसे हे चार अपक्ष उमेदवार देखील निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीतून आधीच माघार घेतली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने प्रयत्न केले, मात्र यश आले नाही. एकूण 7 उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...