Saturday, October 3, 2026
HomeनगरRahuri : राहुरीची माहेरवाशीन तुळजाभवानीची पालखी तुळजापूरकडे रवाना

Rahuri : राहुरीची माहेरवाशीन तुळजाभवानीची पालखी तुळजापूरकडे रवाना

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरीची माहेरवाशिन आई तुळजाभवानी मातेची पालखी राहुरीतून खणा नारळाने ओटी भरवून खेळवत ट्रॉलीमध्ये शहरात मिरवून तुळजापूरकडे उत्साहात रवाना करण्यात आली. तुळजापूर येथील नवरात्रोत्सवासाठी काल राहुरीच्या शिवाजी चौकातील श्री तुळजाभवानी मातीच्या मंदिरात देवीचे मानकरी इंगळे व भगत यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी माजी खा. प्रसादराव तनपुरे, माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे आदींच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी सोनालीताई तनपुरे, सायलीताई तनपुरे, सोहम तनपुरे, ताराचंद तनपुरे, सागर तनपुरे, अशोक आहेर, अनिल कासार, पत्रकार सुनील भुजाडी, नंदकुमार तनपुरे, किशोर इंगळे, संतोष तनपुरे, दत्तात्रय सोनवणे, विक्रम भुजाडी, महेश उदावंत, बाळासाहेब उंडे, अमोल तनपुरे, सुर्यकांत भुजाडी आदींसह मानकरी उपस्थित होते. त्यानंतर शिवाजी चौकात पालखी खेळविण्यात आली.

फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये पालखी ठेवून मेन रोड, आझाद चौक, शनी मारुती चौक, नवी पेठ, शुक्लेश्वर चौक, स्टेशन रोड, कासार गल्ली, कानिफनाथ चौक, क्रांती चौक, सोनार गल्ली मार्गे कोळीवाडा येथे पालखीचे राहुरीकरांनी खणा नारळाने ओटी भरून दर्शन घेतले. यावेळी भवानी मातेचा जयघोष करून भंडार्‍याची मुक्त उधळण करण्यात आली. राहुरी नगरपालिकेच्या वतीने पालखीचे पूजन करून मानकर्‍यांचा सन्मान करण्यात आला. कोळीवाडा येथे पालखी मुळा नदीतून देसवंडीकडे रवाना केली. यावेळी हजारो भक्तांनी ‘आई राजा उदो उदो, तुळजाभवानी माता की जय’ घोषणांनी भावपूर्ण पालखीला निरोप दिला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महिनाभरातच नववधूचे बिंग फुटले, चार मुलांची आई असल्याचे उघड

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत मुंबईतील एका एजंट महिलेने राहुरी तालुक्यातील तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मोठ्या...