Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगावठी दारू भट्टयांवर छापा

गावठी दारू भट्टयांवर छापा

लाखो रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट


बेलगाव कुर्‍हे | प्रतिनिधी Belgaon Kurhe

वाडीवर्‍हे पोलीस ठाणे हद्दीत आज मुळेगांव, पारवेवाडी व कुशेगांव या गावांत अवैध दारु धंदे व गावठी दारुच्या भट्टयांवर कारवाई करण्यात आली. सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

- Advertisement -


आज सकाळी 8 वाजे पासुन पोलीस अधिकारी व अंमलदरांची 3 पथके डोंगरमाथ्यावर जंगलात भर पावसात पायी चालत जावुन कारवाई करत होते. आज टाकण्यात आलेल्या छाप्यात गावठी दारु, गावठी दारु बनविण्याचे रसायन व साहित्य असा एकुण 4 लाख 79 हजार 800 रुपयांचा माल नष्ट करण्यात आला.


कारवाईचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांनी स्वागत केले आहे. या कारवाईत सहभागी सर्व अंमलदारांचे अभिनंदन करून यापुढेही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...