Sunday, November 15, 2026
HomeनगरShrirampur : रेल्वेच्या धडकेत बेलापूरच्या महिलेचा मृत्यू

Shrirampur : रेल्वेच्या धडकेत बेलापूरच्या महिलेचा मृत्यू

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

रूळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत (Railway Hit) बेलापूरच्या 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू (Old Woman Death) झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर येथील तहसीलच्या कामासाठी बेलापूर (Belapur) येथून चार महिला आल्या होत्या. तहसीलकडे जाण्यासाठी त्यांना रेल्वे स्टेशनचा रूळ ओलांडायचा होता. चौघीपैकी तीन महिला रेल्वे स्टेशनवर असलेल्या ब्रिजवरून पलिकडे गेल्या. चौथी महिला जवळचा मार्ग म्हणून थेट रेल्वे रूळावर उतरली.

- Advertisement -

रूळ ओलांडत असतानाच हुगळी-वाराणसी ही गाडी आली. रेल्वेचा आवाज येताच महिला घाबरली. घाबरल्यामुळे गोंधळून रेल्वे रूळाच्या पलीकडे जाण्या ऐवजी ती सरळ रेल्वेरूळावरून पळू लागली आणि रेल्वेखाली सापडून ठार (Death) झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तिघी महिला ब्रिजवरून गेल्यामुळे त्या वाचल्या, जवळच्या मार्गाने जाण्याच्या प्रयत्नात महिलेचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात चॅटिंग-पुराव्यांसह दोषारोपपत्र...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik बहुचर्चित डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाला (Manisha Jejurkar Case) आता कायदेशीर वळण मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाअंती संशयित पती...