अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान
अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूने नगरकरांची झोप उडवलेली असताना आता अस्मानी संकट कोसळले आहे. आज वादळी वार्यासह आलेल्या पावसाने काही वेळ नगरकरांची दाणादाण उडवून दिली. गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, खरबूज आदी पीकांचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे. तर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होणार आहे. सर्दी, खोकला असे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. दरम्यान वादळामुळे वीजेच्या तारा तुटल्याने श्रीरामपूरसह नगर उत्तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते.
कोरोनानंतर नगरकरांवर अस्मानी संकट
ताज्या बातम्या
Nashik Crime News : घरमालकांना लुटणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य,...
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरासह (Nashik City) राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि परराज्यांत भाडेकरू म्हणून राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्याच घरात...




