Wednesday, September 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRain News : केरळसह कर्नाटकमध्ये धुव्वाधार पाऊस; भूस्खलनामुळे ११ जणांचा मृत्यू, जम्मू-काश्मीरमध्ये...

Rain News : केरळसह कर्नाटकमध्ये धुव्वाधार पाऊस; भूस्खलनामुळे ११ जणांचा मृत्यू, जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी

नवी दिल्ली | New Delhi

देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यात केरळमध्ये (Kerla) मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पुरामुळे आठ जणांचा मृत्यू (Death) झाला असून, आठ जण बेपत्ता आहेत. तर कर्नाटकमधील (Karnatka) शिवमोग्गा जिल्ह्यात आज (रविवारी) सकाळी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरावर दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने ७ ऑगस्टपर्यंत देशभरातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

केरळमध्ये ५,७९२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने (Kerla CMO) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण अजूनही बेपत्ता आहेत. तसेच १३ जण जखमी झाले आहेत. पावसामुळे २७ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून १९६ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. प्रशासनाने राज्यभरात २०९ मदत छावण्या उभारल्या असून ५,७९२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

झोपेतच काळाचा घाला

कर्नाटकमधील शिवमोग्गा जिल्ह्यात रविवारी सकाळी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरावर दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये मल्लिकार्जुन (३५), त्यांची पत्नी नागवेणी (२८) आणि त्यांचा ३ वर्षांचा मुलगा संतोष यांचा समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, शाळांना सुट्टी

जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) किश्तवार जिल्ह्यातील छतरू भागात शनिवारी ढगफुटीमुळे अचानक पूर आला. यात अनेक घरे आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले, तर दोन वाहने वाहून गेली. खबरदारीचा उपाय म्हणून किश्तवार, डोडा आणि रामबन येथील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच बांदीपोरा भागात सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या-नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये महामार्ग खचले

दुसरीकडे उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीतील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर चमोली जिल्ह्यातील गौचरजवळील कामेधा येथे बद्रीनाथ महामार्गाचा २० मीटरचा भाग खचला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाला एकाच मार्गिकेवरून (सिंगल लेन) वाहतूक वळवावी लागली आहे.

तमिळनाडूत पावसासाठी प्रार्थना

देशातील बहुतांश राज्ये महापुराचा सामना करत असताना, तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) मात्र भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ३७.५ अंश सेल्सिअसच्या पार गेले असून राज्य भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर, तिरुचिरापल्लीच्या थेन्नूर भागात मुस्लिम समाजातील २,००० हून अधिक लोकांनी एकत्र येत पावसासाठी विशेष प्रार्थना केल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...