Wednesday, June 10, 2026
HomeनाशिकRain Update : उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; शहर जिल्ह्यात पावसाचा...

Rain Update : उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; शहर जिल्ह्यात पावसाचा शिडकावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यातील हवामान स्थितीत वेगाने बदल होत असून, दुपारनंतर नकाशात दर्शविलेल्या विशिष्ट जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) पावसाचे प्रमाण कमी असले तरी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वारा यांचा जोर अधिक राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक दीपक जाधव यांनी वर्तविली आहे.

- Advertisement -

दरम्यान, शहर व जिल्ह्यात सोमवारी (दि.२०) पहाटे २ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने (Rain) हजेरी लावली. जोरदार वारा व विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता. मात्र, पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शहर जिल्ह्यात पावसाचा शिडकावा झाला. ऐन रात्रीच्या सुमारास वारा विजांचा कडकडाट आणि जोराच्या वाऱ्यामुळे शेतकऱयांचे शेतात व खळ्यावरील माल झळकताना मोठी धावपळ उडत असल्याचे चित्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात पहायला मिळत आहे.

हे देखील वाचा : Nashik TCS Case : चौकशीचा फेरा वाढला; राष्ट्रीय महिला आयोगाची समिती घटनास्थळी

सकाळपर्यंत शहराच्या विविध भागात झालेल्या पावसाची १.८ मी.मी.इतकी नोंद झाली. सोमवारी (दि.२०) दिवसभर वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने पंखे वातानुकूलित यंत्रे लावूनच कार्यालय, घरात वेळ काढावा लागला. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात रात्री २ ते पहाटे ४ या वेळेत पावसाचा पॅटर्न तयार होत असल्याचे गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. हवामान अंदाजानुसार, बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने पावसाची तीव्रता उत्तर महाराष्ट्रात मर्यादित असेल; मात्र, विजा पडण्याचे प्रमाण अधिक राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी मेघगर्जनेच्या काळात सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे. राज्याच्या दक्षिण भागात आणि सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही समुद्रांकडून येणाऱ्या बाष्पामुळे गारपीट झाली असून, अजूनही तिथे अशीच शक्यता आहे. डोंगराळ भागात गारपिटीची तीव्रता अधिक जाणवू शकते.

शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी

कांदा आणि इतर पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वच भागात आहे. रात्रीच्या वेळी वारा, विजा आणि सर्पदंशाचा धोका असल्याने शेतकऱ्यांनी रात्री उशिरा धावपळ करण्याऐवजी सायंकाळीच पिके झाकून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मागील काही दिवसांत पिके वाचवण्याच्या प्रयत्नात काही शेतकऱ्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे आरोग्याची आणि जीवाची काळजी घेऊनच शेतीकामांचे नियोजन करावे, असा सल्ला हवामान अभ्यासकांनी दिला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बंदुकीच्या धाकावर संसार; पतीने पत्नीला पळवले

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...