Friday, July 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजयेवला तालुक्यातील उत्तर- पूर्व भागात गारांसह पावसाची जोरदार हजेरी

येवला तालुक्यातील उत्तर- पूर्व भागात गारांसह पावसाची जोरदार हजेरी

कांदा, मका व गहू पिकाला फटका

- Advertisement -

येवला | प्रतिनिधी Yeola

तालुक्यातील उत्तर- पूर्व भागात आज, वादळी वारा आणि गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील राजापूर, जायदरे, पिंपळखुटे, कुसूर, कुसमडी, कोळगाव परिसरात सुमारे अर्धा – पाऊणतास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. कुसूर, कुसमडी, नगरसुल परिसरात गाराही पडल्या. अचानक आलेल्या या पावसाने काढणीला आलेल्या कांदा, मका व गहू पिकाला मोठा फटका बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने अचानक बदल होत आहे. तर सध्या गहूं, कांदा, मका काढणी सुरू आहे. आजच्या अकस्मात पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. काही ठिकाणी काढलेला कांदा तर काही ठिकाणी गहू भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याने शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत.

आधीच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजावर आता, अस्मानी संकटाने अडचणीत आला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी विनोद पाटील यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

आज रंगणार ‘देशदूत शिलेदार पुरस्कार’ सोहळा

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik समाजाच्या विविध स्तरांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक ‘देशदूत’च्या वतीने यंदा प्रथमच ‘देशदूत शिलेदार पुरस्कार २०२६’ या भव्य...