Tuesday, December 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMahayuti-MNS : शिंदे-फडणवीस - ठाकरे यांच्यात गुप्तबैठक; विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा मनसेला 'बिनशर्त'...

Mahayuti-MNS : शिंदे-फडणवीस – ठाकरे यांच्यात गुप्तबैठक; विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा मनसेला ‘बिनशर्त’ पाठिंबा?

मुंबई | Mumbai
राज्यात सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं मनसेने जाहीर केलेलं असतानाच आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत पुन्हा एकदा ‘बिनशर्त’ पाठिंब्यावर चर्चा झाली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता. ज्यानंतर आता निवडणुकीच्या माहोलात भूमिका बदलणार असून, महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिंदे- फडणवीस आणि ठाकरे यांच्यात शनिवारी रात्री मुंबईतील एका हॉटेलमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी रात्री झालेल्या या चर्चेत राज्यातील काही मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याचे समजत आहे. दोन तास चाललेल्या चर्चेत मुंबईतील शिवडी, वरळी आणि माहिम या मतदारसंघासह इतर काही जागांबाबतही चर्चा झाली आहे. त्यामुळे महायुती आणि मनसे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

शनिवारी रात्री १२ वाजता देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरातून मुंबईत आले. रात्री १२ वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा मुंबई विमानतळावरून निघाला. या दोनही नेत्यांच्या वाहनांचा ताफा हा वरळीपर्यंत आला. नंतर हा ताफा अज्ञातस्थळी गेला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला. मध्यरात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या तीन नेत्यांमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. राज ठाकरेंसोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पहाटे तीन वाजता सागर बंगल्यावर गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तीन वाजता वर्षा बंगल्यावर पोहोचले. शनिवारी मध्यरात्री शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये याच धर्तीवर जवळपास २ तास चर्चा झाली असून, आता खरेच लोकसभेच्या ‘बिनशर्त’ची विधानसभेला परतफेड? होणार का, महायुती हा निर्णय घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या