Tuesday, July 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray: "कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही…"; राज ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र...

Raj Thackeray: “कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही…”; राज ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खरमरीत पत्र

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख करत एक खरमरीत पत्र लिहून भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या वर्तवणुकीसंदर्भात संताप व्यक्त केला आहे. अमित साटम यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ मुंबईमध्ये पावसामुळे झालेल्या झाड पडण्याच्या आणि मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याच्या घटनेवरुन हसहसत केलेल्या विधानावर राज यांनी थेट फडणवीसांना सुनावले आहे.

राज ठाकरेंनी काय म्हंटले आहे?
अन्यथा तुमची प्रतिमा इतकीच राहील
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असे महाराष्ट्राला वाटत होते, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

- Advertisement -

हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ?
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तू पसरू देताय? अशी विचारणा करत, देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; लष्कर-ए-तैयबा, जैश शी संबंधित २३ जण दहशतवादी घोषित

तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ?
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती. आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही . ( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील
दरम्यान, खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील. तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत, असे राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘शिवनाथ आयुर्वेद’चा परवाना कायमस्वरूपी रद्द; गडगेबाबाच्या दरबारात...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik अंधश्रद्धेचा बाजार मांडून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या भोंदूबाबांच्या साखळीवर अन्न व औषध प्रशासनाने अखेर कारवाई केली आहे. संगमनेरजवळील वडगावपान येथील बहुचर्चित...