Sunday, November 24, 2024
Homeमनोरंजनराजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली ' फेमिना मिस इंडिया'

राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली ‘ फेमिना मिस इंडिया’

मणिपूर Manipur

59 व्या फेमिना  मिस इंडिया (Femina Miss India 2023) या स्पर्धेच्या विजेतीची काल (15 एप्रिल) घोषणा करण्यात आली. राजस्थानची नंदिनी गुप्ता (Nandini Gupta) ही मिस इंडिया 2023 या स्पर्धेची विजेती ठरली.

- Advertisement -

या स्पर्धेत श्रेया पुंजा आणि  स्ट्रॅल थौनाओजम लुवांग या फर्स्ट आणि सेकंड  रनर-अप ठरल्या. मिस इंडिया स्पर्धेत नंदिनी गुप्तानं  ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये रॅम्प वॉक केला. गेल्या वर्षीची मिस इंडिया सिनी शेट्टी हिने  नंदिनीला क्राउन  घातला. नंदिनी ही 19 वर्षांची आहे. मिस इंडिया ही स्पर्धा जिंकल्यानंतर नंदिनी आता मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

नंदिनी गुप्ता ही राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी आहेत. तेथूनच तिनं  शिक्षण घेतले. तिनं बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच ‘फेमिना मिस इंडिया’ची विजेती बनण्याचे तिचे स्वप्न नंदिनी बघत होती. तिचं स्वप्न पूर्ण झालं आहे. याआधीही ती ‘फेमिना मिस इंडिया राजस्थान’ची विजेती ठरली होती.

आता वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ‘मिस इंडिया’ होऊन नंदितानं अनेक मुलींना प्रेरणा दिली आहे. नंदिनी ही सोशल मीडियावर देखील अक्टिव्ह असते. नंदिनी ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

 फेमिना मिस इंडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नंदिनीचे  मिस इंडिया कार्यक्रमातील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये नंदिनी ही ब्लॅक गाऊनमध्ये दिसत आहे. तिच्या डोक्यावर क्राऊन देखील दिसत आहे.नंदिनीनं आपल्या सौंदर्याने अनेकांची मनं जिंकली आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या