Sunday, August 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी

- Advertisement -

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला संधी दिली जाते, याचा पेच अद्याप सुटलेला नव्हता. या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान आज रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमिटीची बैठक झाली. राज्यसभेच्या जागेवर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान काल (शनिवारी) मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भुजबळ यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा केली होती.

आज रात्री उशीरा पर्यंत चाललेल्या बैठकीनंतर राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली असल्याची अधिकृत माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik News : सुट्टीमुळे सप्तशृंगी गड घाटात वाहतूक कोंडी; भाविक संतप्त

0
सप्तशृंगीगड | वार्ताहर | स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीमुळे श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad Ghat) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे गडाकडे जाणाऱ्या घाट...