Wednesday, October 9, 2024
HomeमनोरंजनRajinikanth Admitted to Hospital : सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल, समोर आलं मोठं...

Rajinikanth Admitted to Hospital : सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण

मुंबई | Mumbai

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज सुपरस्टार रजनीकांत यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजनीकांत यांच्या पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार रजनीकांत यांची २०१६ मध्ये सिंगापूरमधील एका हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट झाली होती. प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांना काल रात्री चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तीव्र पोटदुखीची तक्रार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी मीडियाला दिलेल्या निवेदनात अभिनेत्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत त्यांनी फारसे काही सांगितले नाही. मात्र, सध्या त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. रजनीकांत यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच चाहते सोशल मीडियावर रजनीकांत लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या