Tuesday, December 3, 2024
Homeजळगावराजुमामा तुम्ही पुन्हा या, तेव्हाच भाऊबीज करु!

राजुमामा तुम्ही पुन्हा या, तेव्हाच भाऊबीज करु!

इंद्रप्रस्थ नगरातील महिलांनी व्यक्त केल्या भावना

जळगाव । प्रतिनिधी jalgaon
राजूभाऊ परत आमदार व्हा, तेव्हाच आमची भाऊबीज साजरी होईल अशा शब्दात शुभेच्छा देऊन महिला भगिनींनी आ. राजूमामा भोळे यांना विजयाचे आशीर्वाद दिले. ते इंद्रप्रस्थ नगर, महावीर नगर, राधाकृष्ण नगरात प्रचार रॅलीला आले होते.
आ. राजूमामा भोळे यांनी छत्रपती शिवाजी नगर येथील खडके चाळ येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. तेथून गेंदालाल मिल, कानळदा रोड, लक्ष्मी नगर, इंद्रप्रस्थ नगर, राधाकृष्ण नगर, महावीर नगर परिसरात प्रचार रॅली निघाली. रॅलीत आ.भोळे यांचे सर्वत्र सहर्ष स्वागत करण्यात आले. अनेक जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. इंद्रप्रस्थ नगरातील अंबामाता मंदिरात श्री अंबामातेचा तसेच, गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद आ. भोळेंनी घेतला.

- Advertisement -

यानंतर विविध मान्यवरांच्या घरी जाऊन तेथील जेष्ठांना भेटत आ. भोळे यांनी दिवसाचा पहिला टप्पा यशस्वी केला. दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाला जोरदार पाठिंबा मिळत असून कॉलन्यांमध्ये औंक्षण करण्यासाठी महिलांची रांग लागताना दिसून येत आहे. वेळेच्या मर्यादेत आ. राजूमामा भोळे सर्वांच्या घरी जाऊन नमस्कार करीत आशीर्वाद घेत आहेत. रॅलीत संजय शिंपी, नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, राजू मराठे, कैलास सोनवणे, गबलू खान, मंगेश जोहरे, दीपक झुंजारराव, आनंद सपकाळे, आकाश मोरे, विनय चौधरी, महेश पाटील, मंगला बारी, सरिता माळी कोल्हे आदी उपस्थित होते.

खान्देश केटरिंग असोसिएशनचा पाठिंबा
खान्देश केटरिंग असोसिएशनने येथील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्रदेखील त्यांनी आ.भोळे यांना दिले आहे. त्यावर अध्यक्ष सत्यनारायण जोशी व सचिव रतन सारस्वत यांच्या स्वाक्षरी आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या